Baramati Farmer : पोलिसांना कंटाळून शेतकऱ्याची विष पिऊन दिला जीव : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बारामती तालुक्यातील लाटे येथे शेतकऱ्याने पाटबंधारे विभाग महावितरण विभाग आणि पोलिसांना कंटाळून शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी शेतकऱ्याने व्हिडिओ तयार करून त्या मध्ये सर्व हाकिकत सांगितली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल वायरल होत आहे. हनुमंत सणस असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. बारामती तालुक्यातील लाटेमध्ये क्षेत्र सणस यांचे क्षेत्र आहे. सणस यांच्या रानामध्ये येथील परिसरातील शेतकऱ्यांनी विनापरवाना विद्युतधारक विद्युत पंप बसवलेले असताना त्या शेतकऱ्यांना सणस यांनी काढायला सांगितले. सणस याचे रान मोकळे केले त्यानंतर हनुमंत सणस आणि त्याचा भाऊ त्या रानामध्ये जेसीबी घेऊन साफसफाई करण्यासाठी गेले असताना सणस यांना दमदाटी केली आणि खोट्या केसेस करू अशी धमकी देखील काही लोकांनी दिली. त्यानंतर वारंवार पोलीस स्टेशन मधून हनुमंत सणस आणि त्यांचे बंधू यांना फोन येऊ लागले. या भिंतीला भिऊन हनुमंत सणस यांनी आत्महत्या केली आहे असे जयवंत सणस यांनी सांगितले आहे.