Bangladesh Fire : बांगलादेशमधील ढाकामध्ये इमारतीला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
abp majha web team
Updated at:
01 Mar 2024 09:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBangladesh Fire : बांगलादेशमधील ढाकामध्ये इमारतीला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये सात मजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीत ४३ जणांचा मृत्यू झाला. आगीतील जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं कळतं. काल रात्री दहाच्या सुमारास सात मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये आग लागली. ही आग हळूहळू वरच्या मजल्यांवर पोहोचली आणि ४३ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवलं असून आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.