Bandra Robbery CCTV : सैफसारखा प्रकार या आधीही वांद्र्यात घडला? स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण
Bandra Robbery CCTV : सैफसारखा प्रकार या आधीही वांद्र्यात घडला? स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण
गुरुवारचा दिवस बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीसाठी अत्यंत वाईट दिवस ठरला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रात्रीच्या सुमारास बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या टॉप अॅक्टर्सपैकी एक असलेल्या सैफ अली खानवर (Saif Ali Khan) घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आला होता. एखाद्या दिग्गज सेलिब्रिटीच्या थेट घरात घुसून त्याच्यावर हल्ला करून त्याला गंभीररित्या जखमी केल्यामुळे केवळ इंडस्ट्री नव्हे, तर देशभरात खळबळ माजली होती.
वांद्रे येथील 'सत्गुरु शरण' इमारतीतील सैफच्या फ्लॅटमध्ये घुसलेल्या घुसखोर सर्वात आधी सैफच्या घरात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या खोलीत गेला. त्यानंतर महिला आणि त्याच्यात वादावादी सुरू झाली. हा आवाज ऐकून सैफ अली खान तिथे आला आणि त्यानं चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घुसखोरानं सैफवर चाकून वार केले. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. सैफला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि लगेचच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफवर हल्ला करणाऱ्याला अटक करण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. अशातच नवऱ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पत्नी आणि दिग्गज बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खाननं सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.