Balasaheb Thorat Full PC : सत्यजित तांबे यांचं बोलणं बालिशपणाचं, बाळासाहेब थोरातांनी खडे बोल सुनावले

Balasaheb Thorat Full PC :मराठा समाजाची लग्नाबाबत आचारसंहिता, थोरात म्हणाले; माझा पूर्ण पाठिंबा आहे!

Balasaheb Thorat on Satyajeet Tambe Patil : विधानपरिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe Patil)  यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं होतं. याशिवाय महत्त्वाचं म्हणजे त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला होता. "महाराष्ट्रातील नेत्यांनी एक तासात राहुल गांधीची भेट घेऊन दाखवावी", असं म्हणत सत्यजित तांबे (Satyajeet Tambe Patil)  यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना आव्हान दिलं होतं. दरम्यान, सत्यजित तांबे (Satyajeet Tambe Patil) यांच्या टीकेनंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत. "सत्यजित तांबे यांचं बोलणं बालिशपणाचं, आपल्यासाठी काही केलं असेल त्यांंचं ऋण लक्षात ठेवायचं असतं", असं प्रत्युत्तर बाळासाहेब थोरात यांनी दिलं आहे.  ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी महायुतीत पालकमंत्रिपदावरुन सुरु असलेल्या संघर्षावरही भाष्य केलंय. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola