Murli Deora Balasaheb Thackeray : ...मिलिंद देवरांच्या वडिलांना जेव्हा बाळासाहेबांनी महापौर केलं
1966 साली शिवसेनेची स्थापना साली...त्याकाळी दक्षिण मुंबईत एका नावाची जाम हवा होती...मिलिंद देवरांची वडील मुरली देवरा...देवरा म्हणजे त्याकाळातील मुंबईतील टॉपचे व्यावसायिक... मूळचे राजस्थानी असले तरी मुरली देवरांचा जन्म मुंबईतच झाला...तरुण वयातच त्यांनी व्यवसायात उडी घेतली आणि त्याचसोबत सोशलवर्क ही सुरु केलं... वयाच्या २०शी दरम्यान त्यांनी राजकीय भूमिका घेतली आणि थेट काँग्रेसचा हात धरला...काँग्रेसने देखील मुरली देवराणा संधी दिली आणि देवरा १९६८ साली वयाच्या ३७व्या वर्षी पहिल्यांदा नगरसेवक झाले... पुढे अनेक काळ ते नगरसेवक म्हणून कार्यरत होते पण त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती १९७७ साली... आता दार अडीच वर्षांनी मुंबईचा महापौर बदलतो पण त्याकाळात महापौर पदाची टर्म फक्त एक वर्ष असायची...१९७६ साली मुंबईचे महापौर होते मनोहर जोशी पण १९७७ साली महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस जोर लावला...काँग्रेसला सर्वाधिक जागा होत्या..आणि त्यांच्या खालोखाल दोन नंबरचा पक्ष होता शिवसेना...काँग्रेसकडून महापौर पदाची निवडणुकीत उतरले मुरली देवरा तर जनता पक्षाने उमेदवारी दिली सोनसिंग कोहली यांना... आता मुरली देवरा आणि बाळासाहेब ठाकरेंचे सुरुवातीपासूनच अगदी घरगुती संबंध होते... आणि बाळासाहेब ठाकरे म्हणजे मोठ्या मनाचा नेता..त्यामुळे देवरांनी बाळासाहेबांना साकडं घातलं आणि बाळासाहेब ही तयार झाले...महत्वाचं म्हणजे त्यादरम्यान काँग्रेस आणि शिवसेनेचे संबंधही घनिष्ठ होते... १९७६ ला मनोहर जोशी महापौर झाले ते काँग्रेसच्याच पाठिंब्याने आणि कुणी न विसरले अशा १९७५च्या आणीबाणीला सुद्धा जाहीर पाठिंबा दिला होता...त्यामुळे सगळंच जुळून आलं आणि देवरांची लॉटरी लागली... महापौर पदाची निवडणूक झाली...बाळासाहेबांचा शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना आदेश गेला.. सर्वानीच आपलं मत काँग्रेसच्या पारड्यात टाकलं आणि मुरली देवरा महापौर झाले... महत्वाचं म्हणजे बाळासाहेबांना याचा जोरदार फटका बसला... शिवसेनेचे पहिले महापौर हेमचंन्द्र गुप्तेंना बाळासाहेबांच्या या निर्याणामुळे शिवसेना जय महाराष्ट्र केला...त्यांनी बाळासाहेबांकडे खंत ही व्यक्त केली होती पण बाळासाहेबांनी मुरली देवरांना दिलेला शब्द पाळला... त्यामुळे आज राजकारणात देवरा कुटुंबाचं जे काही स्थान आहे त्यात शिवसेनेचा किंवा बाळासाहेबांचा वाटा हा मोलाचा ठरतो... मुरली देवरा त्यानंतर अनेकदा खासदार देखील झाले पण त्यांच्या पॉलिटकल करिअर किकस्टार्ट केलं ते शिवसेनेचं... आज त्यांचे सुपुत्र मिलिंद देवरा यांनी ठाकरेंची साथ न देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय...त्यामुळे वडिलांना शिवसेना ज्याप्रमाणे पावली त्याच प्रमाणे आता हि मिलींद देवरांना ही पावणार का हे पाहण्यासारखं असेल...