Maharashtra Kesari : बाला रफिक शेखचं आव्हान संपुष्टात, 14-3 असा मोठ्या फरकानं पराभव
Continues below advertisement
साताऱ्यातल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग दुसऱ्या दिवशी एका खळबळजनक निकालाची नोंद झाली. 2018 सालचा महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखचं महाराष्ट्र केसरी कुस्तीतलं आव्हान तिसऱ्याच फेरीत संपुष्टात आलं. मुंबईच्या विशाल बनकरनं बाला रफिकचा 14-3 असा मोठ्या फरकानं पराभव केला. महाराष्ट्र केसरीच्या माती विभागातला हा दुसरा खळबळजनक निकाल ठरला. 2017 सालचा उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतला काल माती विभागात सलामीलाच हार स्वीकारण्याची वेळ आली होती. त्यानंतर अवघ्या 24 तासांत बाला रफिक शेखचंही महाराष्ट्र केसरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
Continues below advertisement