ABP News

Bala Nandgaonkar MNS Worli Speech : वरळीकरांनो साहेबांच्या हाकेला ओ द्या ! नांदगावकरांचं जाहीर आवाहन

Continues below advertisement

Bala Nandgaonkar MNS Worli Speech : वरळीकरांनो साहेबांच्या हाकेला ओ द्या ! नांदगावकरांचं जाहीर आवाहन
जग फिरलेला माणूस आहे आणि त्यांनी जगात जे जे काही चांगलं आहे  ते महाराष्ट्रात कसं आणता येईल याचा त्यांचा विचार आहे...  मला असं वाटतं की संधी साधण्यासाठी नसते...  इतरांना संधी दिलीत ना... तशी एकदा संधी द्या ना...  नाशिककरांनी संधी दिली होती...  एकदा नाशिकमध्ये जाऊन बघा पण आता सुद्धा त्यांनी विल्हेवाट लावली ती गोष्ट वेगळी...  तिथे तिजोरीची चावी सुद्धा आमच्याकडे नव्हती तरी आम्ही तिथे काय केले हे एकदा जाऊन पहा...  संपूर्ण महानगरपालिका ताब्यात असली तर आम्ही काय केलं असतं...  या देशातील मोठे मोठे उद्योगपती तिथे नेले...  आणि त्या उद्योगपतीने तिथे नवीन नवीन उपक्रम राबवले...  नाशिक महानगरपालिकेमध्ये पहिली मीटिंग साहेबांनी घेतली होती...  महापालिकेच्या सर्वाधिकारी सर्व नगरसेवक आणि सर्व कॉन्ट्रॅक्टरला राज साहेबांनी बोलवलं होतं... याला मी साक्षीदार आहे...  तेव्हा त्याने सांगितले की मला नाशिकचा विकास करायचा आहे तुम्ही काय करता ते मला माहित नाही... मी जे काम सांगेन ते मला काम चूक झालेली पाहिजेत... त्यात मी तडजोड करणार नाही...   मी किंवा कुठलाही माझा नगरसेवक तुमच्याकडे टक्केवारी मागायला येणार नाही...  पण काम चोख असलं पाहिजे...  मगाशी काका म्हणाले तेच की एकदा संधी द्या...  आणि वरळी करांनी पहा...  उमेदवार द्यायचा अधिकार त्यांचा आहे कोण उमेदवार असेल तो...  पण या मतदारसंघात मी लोकसभा दोन वेळा लढवली...  वरळी करांनी मला प्रचंड मतदान केलं...  त्याच वरळीकरांना माझी हात जोडून विनंती आहे की साहेबांच्या हाकेला ओ द्या...  प्रत्यक्ष त्यांच्या हातात काही दिलं तर ते बरच काही करू शकतात...  निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी रेल्वे इंजिन लक्षात ठेवा...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram