Manoj Jarange : बीडचे खासदार Bajrang Sonwane आणि जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधवांची जरांगेंशी चर्चा

Continues below advertisement

बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे दुसऱ्यांदा मनोज जरांगेंची भेट घेतली... मध्यरात्री बजरंग सोनवणे आणि जिजाऊंचे वंशज शिवाजी राजे जाधव यांनी जरांगेंची भेट घेतली.. यावेळी त्यांनी जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केलीय. मनोज जरांगेंच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना एकत्र करून आपण राज्यपालांची भेट घेणार असल्याच यावेळी  खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितलं. तर खासदार ओमराजे निंबाळकरांनी जरांगेंची भेट घेतली.. त्यानंतर जाताना मराठा महिला आंदोलकांनी खासदार ओमराजे निंबाळकरांची गाडी अडवली...संसदेत फक्त विषय मांडू नका, तर सभागृह बंद पाडा अशी मागणी मराठा आंदोलकांनी ओमराजेंकडे केलीय.. 

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे  (Manoj Jarange Patil )  यांनी राज्य सरकारला (maharashtra government) डेडलाईन दिली आहे. ते म्हणाले की,  "मी सकारात्मक आहे, जर निर्णय झाला नाही तर उद्या पाच वाजता मी माझा निर्णय घेईल." दरम्यान, मनोज जरांगे यांच्या मागण्याविषयी चर्चा करण्यासाठी आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ येणार आहे. 

मला भेटायला येणारे नेते मराठा म्हणून भेटायला येतायत, मी फक्त त्यांना समाजाचे प्रश्न सांगतो. मी सरकारसोबत चर्चेसाठी तयार आहे, पण आरक्षणाचा विषय तडीस नेणार आहे की नाही? हा प्रश्न महत्वाचा आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram