Bajrang Sonwane Full Speech : बीडचा खासदार होणं सोप्प नव्हतं, पवारांसमोर बजरंग सोनावणेंचं दमदार भाषण
Bajrang Sonwane Full Speech : बीडचा खासदार होणं सोप्प नव्हतं, पवारांसमोर बजरंग सोनावणेंचं दमदार भाषण
Sharad Pawar on Nilesh Lanke, Ahmednagar : "खर सागायचं म्हणजे निलेश लोकसभेत चालल्यानंतर मला काळजी एकाच गोष्टीची आहे. जे आमचे सभासद आहेत, त्यामध्ये जुने सभासद आहेत. त्यांना पार्लमेंटमध्ये सगळेजण नक्की विचारतील, हा कोण गडी याठिकाणी आणला. मी त्यांना सांगितलं, तिथे मराठीत सुद्धा भाषण करता येत. तुम्ही मातृभाषेत बोलू शकता. एकदा का माईक हातात आला तर निलेशजी मराठीमध्ये काय बोलतील याचा भरोसा नाही. त्याबद्दल कमतरता भासणार नाही", असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापनदिन अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलाय. यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), जयंत पाटील (Jayant Patil) आणि राष्ट्रवादीचे खासदार उपस्थित होते.