
Badlapur Girl Student : बदलापूर पूर्वेला नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार
Badlapur Girl Student : बदलापूर पूर्वेला नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार
दलापुरातील एका नामांकित शाळेत ४ वर्ष वयाच्या दोन चिमुकलींवर शाळेतच अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणी शाळेतील कर्मचाऱ्याला बदलापूर पोलिसांनी अटक केली .
Vo-मात्र इतकं संवेदनशील प्रकरण असताना देखील बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकानी गुन्हा दाखल करण्यासाठी १२ तासांचा अवधी घेतला .शिवाय शाळा प्रशासनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे पालकांनी आज आक्रमक होत शाळेला जाब विचारण्यासाठी शाळेच्या गेट वर मोठी गर्दी केली आहे. शाळा प्रशासनाने येऊन आमच्याशी बोलावं अशी पालकांची मागणी आहे. त्याचबरोबर आज नागरिकांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे ,या बदलापूर बंद मध्ये रिक्षा चालक व्यापारी संघटना,शाळा बस चालक देखील सहभागी झालेत. घटनास्थळी सध्या पालक वर्ग शाळा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत आहे