Badlapur Crime News :अत्याचार, आंदोलन, लाठीचार्ज आणि दगडफेक; बदलापूरचा स्पेशल रिपोर्ट
Badlapur Crime News Special Report :अत्याचार, आंदोलन, लाठीचार्ज आणि दगडफेक; बदलापूरचा स्पेशल रिपोर्ट
Badlapur School Case : ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडल्याने संपूर्ण शहरात संतापाची लाट पसरली आहे. सर्वजण रस्त्यावर उतरले. संतप्त नागरिकांनी रेल्वे रुळांवर उतरून रेल रोको निदर्शने केली. रेल्वे रुळांवर जमाव आक्रमक झाल्याने पोलिसांवर दगडफेक झाल्याच्या घटना सुद्धा घडल्या. बदलापूरच्या भडक्यात रेल्वे पोलिस आयुक्त रविंद्र शिसवेंसह 10 पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत.
आता बदलापुरात आंदोलन चिघळवणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु करण्यात आली आहे. माध्यमे आणि पोलिसांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर येथील शाळेत दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. हा खटला जलदगतीने चालवला जाईल आणि त्यासाठी विशेष सरकारी वकील नेमावा, असेही शिंदे म्हणाले.