Badlapur Crime News : सकाळी 6 वाजता शाळेसमोर आंदोलन ते संध्याकाळी लाठीचार्ज; बदलापुरात आज काय घडलं?

Continues below advertisement

Badlapur Crime News : सकाळी 6 वाजता शाळेसमोर आंदोलन ते संध्याकाळी लाठीचार्ज; बदलापुरात आज काय घडलं?

ही बातमी पण वाचा

बदलापूर पाठोपाठ ठाण्यातील कळवा रुग्णालयातही धक्कादायक प्रकार; 42 वर्षीय व्यक्तीचे अल्पवयीन मुलीवर नको ते कृत्य

बदलापूर Badlapur : काही दिवसांपूर्वी कोलकातामध्ये झालेल्या महिला डॉक्टरचा अमानुष छळ आणि त्यानंतर तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. ही घटना ताजी असताना अशीच एक धक्कादायक घटना आज बदलापूर (Badlapur Crime) शहरातून समोर आली आहे. यात चार वर्षांच्या चिमूरडींवर शाळेतील सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याची  घटना घडली आहे. सध्या या घटनेच्या निषेधार्थ राज्यात तीव्र उद्रेक उमटताना दिसून आले आहे. बदलापूरमध्ये या घटनेला हिंसक वळण लागले आहे.

ही घटना ताजी असताना अशीच एक संतापजनक घटना ठाण्यातील कळवा रुग्णालयाच्या (Kalwa Hospital) परिसरातून समोर आली आहे. यात एक 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न एका अज्ञात व्यक्तिने केलाय. मात्र वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने या इसमाला सुरक्षा रक्षकांनी आणि निवासी डॉक्टरांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.   

42 वर्षीय व्यक्तीचे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

ठाण्यातील कळवा रुग्णालय नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो.  मात्र, यावेळी रुग्णालयात घडलेल्या एका घटनेन सर्वत्र एकच खळबळ माजलीय. यात एक 42 वर्षीय इसम रुग्णालय परिसरात बागेत बसून एका अल्पवयीन मुलीशी आक्षेपार्ह वर्तन करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याच वेळी रुग्णालयात कोलकाता येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी ज्युनियर डॉक्टर्स आंदोलन करत होते. त्यातील काही आंदोलकांना बागेत ती मुलगी आणि इसम यांचे सुरू आसलेल्या वर्तणुकीचा संशय आला असता, त्यांनी त्या ठिकाणी धाव घेत सुरक्षा रक्षकना बोलावले. त्यानंतर तात्काळ रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी इसमाला हटकले आणि मुलीला इसमाला ओळखते का या बाबत विचारणा केली. तर मुलीने आपण त्या व्यक्तीला ओळखत नसल्याचं सांगितलं. त्यावरून सुरक्षा रक्षकांनी आणि ज्युनिअर डॉक्टरांनी त्याला धरून कळवा पोलिसांच्या ताब्यात दिले.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram