Badlapur Crime News : बदलापूर स्टेशनवर तणाव; पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न, लापलेल्यांचा शोध
Badlapur Crime News : बदलापूर स्टेशनवर तणाव; पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न, लापलेल्यांचा शोध
ही बातमी पण वाचा
Badlapur School Case : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातून उद्या मुंबईला पोहोचणार, बदलापूर प्रकरणामुळे गावचा दौरा रद्द करणार
Badlapur School Case : कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येदरम्यान, ठाण्यातील बदलापूर येथील (Badlapur School Case) एका शाळेत दोन चिमुरड्या मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती समोर आल्यानंतर मंगळवारी संतप्त जमाव आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. जमावाने आधी शाळेची तोडफोड केली, त्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर गाड्या रोखल्या.जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, त्यानंतर लोकांनी दगडफेक सुरू केली. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. 23 वर्षीय आरोपीने 16 ऑगस्ट रोजी शाळेच्या बाथरूममध्ये मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते. मुलींच्या पालकांनी एका दिवसानंतर (17 ऑगस्ट) एफआयआर दाखल केला.
पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी अक्षय शिंदे याला अटक केली आहे. या भागातील महिला पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांची बदली करण्यात आली आहे. शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि एका महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावरून उद्या मुंबईला परतणार आहेत. बदलापूर केसमुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री शिंदे सातारमधील त्यांच्या दरे या मुळ गावी तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी पोहोचले होते.