Badlapur Case : बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी सुमोटो अंतर्गत याचिका दाखल

Continues below advertisement

Badlapur Case : बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी सुमोटो अंतर्गत याचिका दाखल  

 बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी अख्खं बदलापूर रस्त्यावर उतरलं होतं. अशातच आता या प्रकरणात एक ट्विस्ट समोर आला आहे. शाळेतील लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अक्षय शिंदे याच्या वडिलांनी एक खळबळजनक दावा केला आहे. माझ्या मुलाला याप्रकरणात फसवले जात असल्याचा दावा अक्षय शिंदे याच्या वडिलांनी केला. त्यामुळे आता याप्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.   बदलापूर (Badlapur Crime) प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचे आई-वडील आणि लहान भावाशी मोबाईल फोनवरुन (Mobile Phone) संपर्क साधण्यात आला. त्यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण देणारा दावा केला. अक्षय शिंदे याने मुलींसोबत जे काही केले, तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. अक्षयला फसवण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 'एबीपी माझा'शी बोलताना अक्षयच्या कुटुंबियांनी असा कोणताच प्रकार घडला नसल्याचं सांगितलं. यामध्ये अक्षयला फसवलं जात असल्याचंही सांगितलं. अक्षयचं काम बाथरूम सफाईचे आहे, तो बाथरुममध्ये कसा जाणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  आमच्या घरातील सगळ्यांना मारहाण झाली आहे. पोलीस ठाण्यात गेल्यावर आम्हाला अक्षयनं काहीतरी केलं आहे, असे सांगण्यात आले. तसेच, अक्षयची पुन्हा मेडिकल चाचणी करा, अशी मागणीही अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी केली आहे.                          

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram