Badalapur Sation Stone Pelting : बदलापूर स्टेशनवर आंदोलक आक्रमक; पोलिसांवर दगडफेक
Badalapur Sation Stone Pelting : बदलापूर स्टेशनवर आंदोलक आक्रमक; पोलिसांवर दगडफेक
दलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरून स्थानिक पोलीस आणि शाळा प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात असतानाच आता शाळेने माफीनामा जाहीर केला आहे. याप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले आहे.
मंगळवारी सजग नागरिकांनी शाळेविरुद्ध आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना हा खटला फास्टट्रॅकवर चालवण्याची मागणी केली आहे. तर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी याप्रकरणी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. तर यात हलगर्जीपणा करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
सबंधित संस्थेने जाहीर केलेल्या माफिनाम्यात या प्रकाराला तो दुर्दैवी, घृणास्पद आणि निंदनीय म्हटले आहे. या प्रकारानंतर सबंधित आरोपी विरुद्ध कारवाई करण्यासाठी पूर्ण क्षमतेने संस्थेने पोलिसांना सहकार्य केले. या घटनेनंतर सबंधित कर्मचाऱ्यावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी संस्थेचा आग्रह आहे, असे शाळेने निवेदनात म्हटले आहे. आरोपीची हकालपट्टी करण्यात आली असून ज्या खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून हा कर्मचारी कंत्राटी पद्धतीने संस्थेच्या सेवेत आला होता. त्या कंत्राटदार कंपनीला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकून त्याचा करार रद्द केला आहे. तसेच हा प्रकार ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या मुख्याध्यापिका यांना निलंबित करण्यात आल्याचेही संस्थेने सांगितले आहे. तसेच त्या वर्गाच्या वर्गशिक्षका, मुलांची ने आण सुरक्षितरित्या करण्याची जबाबदारी असणाऱ्या सेविका यांनाही सेवेमधून कमी करण्यात आले आहे. पूर्व प्राथमिक आणि शिशु वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या आणि सांभाळ करण्याच्या दृष्टीने फक्त महिलांचीच नेमणूक केली जाणार आहे. या प्रकरणात पालकांना झालेल्या मनस्तापाबद्दल संस्थेने त्यांची जाहीर माफी मागितली असून त्यांना कायदेशीर मदत देऊ केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सर्व पालक, विद्यार्थी आणि शहरातील सजग नागरिकांना संस्थेने शांततेचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी संस्था तयार असल्याचेही संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल यांनी सांगितले आहे.