Sindhudurg : कुडाळमध्ये भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते भिडले, सिंधुदुर्गात राडा
Sindhudurg : कुडाळमध्ये भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते भिडले, सिंधुदुर्गात राडा
नारळीपौर्णिमेनिमित्त कुडाळ शहरात भाजप आणि ठाकरे शिवसेनेकडून वेगवेगळ्या रॅलींचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून कुडाळ पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरी देखील ठाकरे शिवसेना कार्यालयाकडे दोन्ही पक्षांच्या रॅली येताच वाहतुकीची कोंडी झाली. यादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी फटाके लावून जल्लोष केला. त्यामुळे भाजप आणि ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यां जोरदार राडा झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं