Amravati : पाण्यासाठी गाव सोडलं! गेल्या 28 दिवसांपासून ग्रामपंचायतीनं पाणीपुरवठा बंद केल्याचा आरोप
अमरावतीच्या जिल्ह्यातल्या सावंगी मग्रापूर गावात मागासवर्गीय समाजातील अनेकांनी गाव सोडलंय. त्यांच्या प्रभागात गेल्या २८ दिवसांपासून ग्रामपंचायतीनं पाणीपुरवठा केला नाही, असा त्यांचा आरोप आहे. गावाबाहेरच्या विहिरीजवळ या नागरिकांनी ठाण मांडलंय. उपसरपंचानं जाणीवपूर्वक पाणीपुरवठा बंद केल्याचा त्यांचा आरोप आहे.