Bacchu Kadu Majha Katta : शेतकरी महिलेनं साडीचा पदर फाडून बच्चू कडूंच्या हातात का बांधला?

Continues below advertisement
शेतकरी नेते आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या आणि आंदोलनाच्या भविष्यातील रणनीतीवर सविस्तर भूमिका मांडली आहे. 'सरकारने शेतकऱ्यांसोबत विश्वासघात केला तर बच्चू कडू काही सोडणार नाही, कारण भाजपचं सरकार म्हणजे हिंदू रक्षकांचं सरकार आहे आणि सगळ्यात जास्त हिंदू शेतकरी आहे,' असा थेट इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. परभणीतील शेतकरी सचिन जाधव आणि त्यांच्या गर्भवती पत्नीच्या आत्महत्येचा उल्लेख करत त्यांनी समाजाच्या असंवेदनशीलतेवर दुःख व्यक्त केले. तसेच, सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून देत, आश्वासन न पाळल्यास राज्यभर 'रेल रोको' आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. आगामी काळात निवडणुका संपल्यानंतर राज्यव्यापी पायी यात्रा काढून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अधिक तीव्र लढा उभारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola