Bacchu Kadu : प्रहार जनशक्ता कार्यालयासाठी जागा रद्द; भाजप साधा साप नाही,विषारी नाग-कडू
Continues below advertisement
आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. मंत्रालयाजवळील प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) कार्यालय परत घेतल्याने हा वाद निर्माण झाला आहे. 'आम्ही विष आहोत. आम्ही दुधातही विष आहे, आमच्या पेड्यातही विष आहे, भाजपनं दाखवून दिलंय', अशा शब्दात बच्चू कडू यांनी भाजपवर (BJP) टीका केली आहे. एकनाथ शिंदे सरकारने जनता दल सेक्युलर पक्षाची जागा कमी करून प्रहार पक्षाला ७०० चौरस फुटांचे कार्यालय दिले होते. मात्र, आताच्या सरकारने हा निर्णय रद्द केल्याने बच्चू कडू नाराज झाले आहेत. भाजपची नीती 'गरज सरो वैद्य मरो' अशी आहे आणि ते केवळ आमच्यासाठीच नाही, तर त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठीही विष बनत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. यावर, बच्चू कडू यांनी राजीनामा दिल्याने कार्यालय परत घेणे ही एक प्रशासकीय प्रक्रिया आहे, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement