Bachchu Kadu Protest | बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभर Chakka Jam; नागपुरात कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले!

बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाने राज्यभर चक्का जाम आंदोलनाची हाक दिली आहे. शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, शेतमजुरांसाठी अपघात विमा लागू करणे, मेंढपाळ आणि मच्छिमारांचे प्रश्न तसेच अपंगांचे प्रलंबित प्रश्न या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे. आंदोलकांची प्रमुख मागणी आहे की, "कर्जमाफीची तारीख निश्चित केली पाहिजे. आपला अहवाल कधी तयार होईल आणि कोणत्या तारखेला कर्ज प्रस्ताव कॅबिनेटसमोर आणून कर्जमाफी केली जाईल, हे सरकारने स्पष्ट करावे." दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील गोंडखैरी येथे प्रहारच्या वतीने चक्का जाम आंदोलन होणार होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. काल रात्री उशिरा नागपूर जिल्ह्यातील प्रहारचे पदाधिकारी रजनीकांत आतकरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी थेट बच्चू कडूंना फोन लावून पोलिसांच्या कारवाईची माहिती दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola