Bacchu Kadu Rail Roko Warning: बच्चू कडू आक्रमक, मुंबईत बैठकीस नकार, रेल रोकोचा दिला इशारा
Continues below advertisement
नागपूरमध्ये (Nagpur) बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे सरकार आणि आंदोलकांमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. 'आंदोलन सोडून मुंबईला (Mumbai) येणार नाही', अशी ठाम भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. सरकारने चर्चेसाठी मुंबईला येण्याचं आवाहन केलं होतं, मात्र बच्चू कडू यांनी हे अवाहन फेटाळून लावत नागपूरमध्येच बैठक घेण्याची मागणी केली आहे. चर्चेसाठी मुंबईला गेल्यास पोलीस दडपशाहीने आंदोलन गुंडाळले जाईल, अशी भीती कडू यांनी व्यक्त केली आहे. १२ वाजेपर्यंतची मुदत संपल्याने आता बच्चू कडू आणि त्यांचे कार्यकर्ते 'रेल रोको' करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे, ज्यामुळे तणाव आणखी वाढला आहे. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बच्चू कडू यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement