Rajan Patil Join BJP : राजन पाटील आणि यशवंत माने हे दोन माजी आमदार भाजपात जाणार
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात, विशेषतः सोलापूर जिल्ह्यात मोठी उलथापालथ झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि जेडीएस (JDS) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil), यशवंत वाने (Yashwant Vane), राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील (Ajinkya Rana Patil) आणि लोकनेते कारखान्याचे चेअरमन बालराज पाटील (Balraj Patil) हे भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश बुधवार, २९ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या सामूहिक पक्षबदलामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची ताकद वाढल्याचे मानले जात आहे. या नेत्यांच्या पक्षबदलाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती, अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement