Maharashtra Politics: 'तुझं पोट फाडून बाहेर नाही आलो तर नावाचा नाही', Uddhav Thackeray यांचा Anaconda टीकेवरून हल्लाबोल

Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांना धार आली असून, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) नेत्यांमध्ये नवा सामना रंगला आहे. उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना 'अॅनाकोंडा' संबोधल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. 'त्याला मुंबई गिळायची आहे, त्याचं पोट फाडून बाहेर नाही आलो तर नावाचा नाही', असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनाच 'भस्म्या रोग झालेला अॅनाकोंडा' आणि 'अजगर' म्हणत पलटवार केला. तर भाजपनेही ठाकरेंवर टीका करत, 'आयत्या बिळावरचा नागोबा' असे संबोधून मुंबई आणि राज्यातील सत्तेवरून प्रश्न उपस्थित केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांकडून एकमेकांना सरपटणाऱ्या प्राण्यांची उपमा देण्यास सुरुवात झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola