Farmers Protest: 'Ramgiri वर संध्याकाळी ५ नंतर धडकणार', Bachchu Kadu यांचा इशारा

Continues below advertisement
शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी नागपूरमध्ये (Nagpur) मोर्चाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निवास्थान असलेल्या रामगिरी (Ramgiri) बंगल्याबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बच्चू कडू यांनी, ‘संध्याकाळी पाच वाजल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाकडे कूच करणार’ असल्याचा इशारा दिला आहे. पोलिसांनी बच्चू कडू आणि त्यांच्या मोर्चेकऱ्यांसाठी नागपूर-वर्धा रोडवरील कापूस संशोधन केंद्राजवळ एक स्टॉपेज पॉइंट निश्चित केला आहे. हे ठिकाण रामगिरी बंगल्यापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे बच्चू कडू आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचू शकतील का, याबद्दल शंका आहे. मात्र, त्यांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी परिसरातील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola