Bacchu Kadu : विधानसभा निवडणुकीत प्रहार संघटना 20 उमेदवार रिंगणात उतरवणार

Continues below advertisement

आगामी विधानसभा निवडणुकीत प्रहार संघटना २० उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. आमचे २० उमेदवार असतील. सोबतच प्रस्थापिक पक्षांनी ज्यांना उमेदवारी नाकारली, त्या बंडखोरांनाही प्रहार संघटनेकडून तिकीट देऊ असं कडूंनी सांगितलं. 

Bacchu Kadu on Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठीच्या मागणीला घेऊन मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आजपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे. अंतरवाली-सराटी गावात ते उपोषणाला बसले असून पहिल्याच दिवशी त्यांनी एल्गार पुकारत राज्य सरकारला आणि मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीला पाठिंबा न देणाऱ्या आमदारांना थेट इशारा दिलाय. तसेच, आंदोलनास होत असलेल्या विरोधावर आणि जातीवादी म्हणून टीका करणाऱ्यांवरही त्यांनी भाष्य केलंय.

अशातच पहिल्यापासूनच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन करणारे प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडूंनीही (Bacchu Kadu) सरकारला इशारा दिला आहे. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, आजपासून मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले. त्यामुळे सरकारने सकारात्मकपणे समोर आलं पाहिजे. सरकारने त्यांना जे आश्वासन दिलं, त्यानुसार आता कारवाई करावी. इतके सहज आणि सोपं हे प्रकरण असून सरकारने यावर ठोस भूमिकाघेत हा प्रश्न आता मार्गी लावावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram