Bachchu Kadu Akola : एकनाथ शिंदेंवर आजही प्रेम कायम आहे, मात्र...

Continues below advertisement

Bachchu Kadu Akola : एकनाथ शिंदेंवर आजही प्रेम कायम आहे, मात्र... राज्यातल्या सर्वच आघाड्यांमध्ये सध्या मुख्यमंत्री कोण?, यावरून मोठी चर्चा सुरू आहेय. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाबद्दल परिवर्तन महाशक्ती आघाडीचे नेते बच्चू कडू यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी मुख्यमंत्री व्हायला कुणाला आवडणार नाही? असं म्हटलंय. ते अकोला जिल्ह्यातील अकोट येथे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आले होतेय. त्यानंतर ते 'एबीपी माझा'शी बोलत होतेय. दरम्यान, महाविकास आघाडी आणि महायुती मधील पाडापाडीचा आपल्या तिसऱ्या आघाडीला मोठा फायदा होणार असल्याचं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलंय. महायुती आणि महाविकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षाला आपला मुख्यमंत्री हवा आहेय. त्याचा फायदा आम्हाला होत आमची आघाडीच एक नंबर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आपलं आजही प्रेम कायम आहेय. मात्र, त्यांनी मजूर आणि दिव्यांगांचे काही प्रश्न न सोडवल्याने आपण त्यांना सोडचिठ्ठी दिल्याचं बच्चू कडू म्हणालेय. निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सत्तेची चावी परिवर्तन महाशक्तीच्या हाती असेल असेही ते म्हणालेय. शेतकरी, दिव्यांगाच्य प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ऐकलं नाही, तर आमची आघाडी मुख्यमंत्र्याचा सभागृहात गणपती करणार असल्याचा ते म्हणालेय. बच्चू कडू यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram