Bacchu Kadu Rail Roko: नागपुरात बच्चू कडूंच्या आंदोलकांचा रेल्वे रोको पोलिसांनी हटवला

Continues below advertisement
नागपूरमध्ये (Nagpur) आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी (Farm Loan Waiver) रेल्वे रोको आंदोलन केले. 'अरे आंदोलनात जाणं हा काही गुन्हा आहे का?', असा सवाल करत बच्चू कडू यांनी सरकारला धारेवर धरले. जामठा परिसरात रेल्वे ट्रॅकवर उतरलेल्या आंदोलकांना पोलिसांनी काही वेळाने बाजूला केले, मात्र आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. राज्य सरकारने मुंबईत चर्चेसाठी बोलावले आहे, पण चर्चा नागपुरातच, आंदोलनस्थळी झाली पाहिजे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. जोपर्यंत कर्जमाफीवर ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. या 'रेल रोको'मुळे अनेक रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola