Badamrao Pandit Join Bjp : बदामराव पंडितांचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र', भाजपमध्ये प्रवेश
Continues below advertisement
माजी मंत्री बदामराव पंडित यांनी अखेर ठाकरे गटाच्या शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेवराईमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर, पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 'जवळजवळ बऱ्याच दिवसांपासून मला बीजेपी मधे प्रवेश करायचं होतं', अशी स्पष्ट कबुली बदामराव पंडित यांनी पक्षप्रवेशानंतर दिली आहे. पंडित यांच्या या प्रवेशामुळे गेवराईतील राजकीय समीकरणे बदलणार असून हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजपत प्रवेश करताच त्यांनी आपले पुतणे आमदार विजयसिंग पंडित यांच्यावर जोरदार टीका केल्याने कौटुंबिक संघर्षही समोर आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement