TOP 100 Headlines : 12 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 30 OCT 2025 : ABP Majha
Continues below advertisement
नागपूरमध्ये बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आंदोलनाला (Farmers' Protest) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पाठिंबा दिल्याने आंदोलनाची धग वाढली आहे. 'सरकार मायबाग गरिबाच्या पोटाचं काय?' असा सवाल आंदोलकांनी विचारला आहे. सातबारा कोरा करावा म्हणजेच संपूर्ण कर्जमाफी व्हावी, ही आमची प्रमुख मागणी असल्याचे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी म्हटले आहे. तर, कर्जमाफी देताना कोणत्याही अटी लावू नयेत, अशी मागणी राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांचे बनावट आधार कार्ड बनवल्याप्रकरणी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यासोबतच, धारावी पुनर्विकास प्रकल्पातील (Dharavi Redevelopment) अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन मुलुंडच्या जागेवर करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement