Manoj Jarnage Meet Bacchu Kadu: बच्चू कडूंच्या पाठिशी उभं राहाणं गरजेचं, म्हणून भेट घेणार

Continues below advertisement
नागपुरात बच्चू कडू (Bachchu Kadu), राजू शेट्टी (Raju Shetti) आणि महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. 'आंदोलन उभं करताना कोणाच्या कागदाच्या पाठिंब्यावर चालत नाही, एखादा खूप मोठी गाडी घेऊन आला म्हणून आंदोलन चालवायचे नसतं,' असे म्हणत आंदोलकांनी मोठ्या नेत्यांच्या अनुपस्थितीवर टीका केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला असला तरी शरद पवार यांच्यासारखे मोठे नेते प्रत्यक्ष सहभागी न झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बच्चू कडू यांच्यासह सहा जणांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहे. या बैठकीत कर्जमाफी आणि इतर मागण्यांवर तोडगा निघण्याची शक्यता आहे, मात्र जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola