Farmers' Protest: 'कर्जमाफीसाठी बामणाची वाट बघताय का?' बच्चू कडूंचा CM Fadnavis यांना थेट सवाल.

Continues below advertisement
प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी शेतकरी कर्जमाफी (Farmer Loan Waiver) आणि सोयाबीन खरेदीच्या (Soybean Procurement) मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. 'कर्जमाफीचा मुहूर्त काढायला बामणाची वाट बघत आहात का? तुम्हाला वेळ नसेल तर युपीमधून एखादा बामण आणून देतो,' अशा शब्दात बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केला. सांगोल्यातील घेरडी येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या आसूड मेळाव्यात बोलताना, 'आजवर इतका लबाड मुख्यमंत्री देशानं पाहिला नाही,' असेही ते म्हणाले. सोयाबीन खरेदीचा प्रस्ताव केंद्राला पाठवल्याच्या सरकारच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, पंतप्रधान मोदींना (PM Modi) जाग कधी येणार आणि खरेदी कधी सुरु होणार, अशी विचारणा करत त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola