Kadu vs Vikhe-Patil: 'जो गाडी फोडेल त्याला १ लाखाचं बक्षीस', बच्चू कडूंचा राधाकृष्ण विखेंना थेट इशारा

Continues below advertisement
शेतकरी नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांच्यातील वाद कर्जमाफीच्या (Farm Loan Waiver) मुद्द्यावरून पुन्हा पेटला आहे. 'जो राधाकृष्ण विखे-पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयांचं बक्षीस देईन', अशी खळबळजनक घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी विखे-पाटील यांनी 'कर्ज काढून कर्जमाफी मागायची' असं विधान केलं होतं, ज्यावर कडू आक्रमक झाले. 'नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य कंसाची करायची, ही कंसाची अवलाद मुख्यमंत्र्यांनी हाकलून लावली पाहिजे', अशी मागणीही कडू यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली. 'मला विखे पाटलांची गाडी दिसली तर मी स्वतः ती फोडेन, ही नालायकी सहन करणार नाही', असा थेट इशारा देखील बच्चू कडूंनी दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola