Farmers' Protest : 'बैठक म्हणजे अटकेचा कट, लोकांना मूर्ख बनवू नका', बच्चू कडू सरकारवर कडाडले

Continues below advertisement
विदर्भात बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून, चंद्रशेखर बावनकुळे आणि सरकारवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. 'एवढ्या लोकांना समजतं बावनकुळे साहेब, एवढे मूर्ख नसावं बनवा तुम्ही लोकांना', असा थेट हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला आहे. ज्या दिवशी आंदोलन होते, त्याच दिवशी सरकारने बैठक का बोलावली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आंदोलनाच्या नेत्यांना एकत्र बोलावून अटक करण्याचा आणि आंदोलन दडपण्याचा हा सरकारचा डाव होता, असा आरोपही कडूंनी केला. जर आमच्या मागण्यांचे पत्र सरकारकडे होते, तर बैठकीची गरजच काय होती, थेट निर्णय का घेतला नाही, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक आंदोलकांकडून कोणीही न आल्याने अखेर रद्द झाली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola