Chandrakhan Khaire : ठाकरे गटाच्या बैठकीत राडा, खैरेंनीच कार्यकर्त्यांना झापलं

Continues below advertisement
शिवसेना ठाकरे गटाच्या आढावा बैठकीत, ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्यासमोरच कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याने गोंधळ उडाला. 'प्रत्येक पक्षात घरातलं भांडण चालू असतं, तुतुमेमे असतेच,' असे म्हणत खैरेंनी परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. एका जिल्हाप्रमुखाने केलेल्या वादग्रस्त भाषणानंतर कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले, ज्यामुळे बैठकीचे वातावरण चांगलेच तापले. संतापलेल्या चंद्रकांत खैरेंनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना कडक शब्दांत झापले आणि हा सर्व प्रकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच, वादग्रस्त भाषण करणाऱ्या जिल्हाप्रमुखावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. 'ज्यांना वाटलंय, त्यांनी पक्ष चालवावा,' या शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola