Bacchu Kadu Majha Katta:त्यांच्या 2 थोबाडीत मारल्या पाहिजे,आंदोलनाच्या टायमिंगवर प्रश्न, कडू संतापले

Continues below advertisement
शेतकरी नेते आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आपल्या आंदोलनाच्या वेळेवर (Timing) प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. 'कशाही पद्धतीचं मनात आलं वर म्याऊ म्याऊ बक दिया...दोन ठोभाडिक मारले पाहिजे', अशा शब्दात बच्चू कडूंनी आपला संताप व्यक्त केला. महायुती (Mahayuti) सरकारसाठी आपलं आंदोलन 'ब्लेसिंग इन डिसगाइज' ठरल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आंदोलनांपासून लक्ष हटवण्यासाठी आपण आंदोलन केल्याचा दावा मूर्खपणाचा असल्याचे ते म्हणाले. आपण गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून कर्जमाफीसाठी (Loan Waiver) लढत आहोत, कुणालाही थांबवलं नव्हतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. उलट, आपल्या आंदोलनामुळेच विरोधकांच्या हातात मुद्दा मिळाला आणि सत्ताधाऱ्यांकडून मुद्दा बाहेर काढला, असेही कडू म्हणाले. शेतकऱ्यांच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये आपल्या नावाची दहशत असणं चांगलंच आहे, असं म्हणत त्यांनी आपल्या आक्रमक कार्यशैलीचं समर्थनही केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola