Bacchu Kadu Warn Goverment: कर्जमाफीसाठी सरकारला बच्चू कडूंचा अल्टीमेटम, रेल्वे रोखण्याचा इशारा
Continues below advertisement
शेतकरी कर्जमाफीच्या (Farmer Loan Waiver) मागणीसाठी आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी नागपूरमध्ये (Nagpur) चक्काजाम आंदोलन (Chakka Jam Protest) सुरू केलं आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे आता 'जय जवान जय किसान नाही तर मर जवान मर किसान असं म्हणायची वेळ आली आहे', अशा शब्दात बच्चू कडू यांनी सरकारवर टीका केली. कडूंच्या या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून, नागपूरमधील चार प्रमुख महामार्ग रोखून धरण्यात आले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबई दौऱ्यावर असल्याने, त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घालून मदत करावी, अशी मागणी कडू यांनी केली आहे. सरकारने दुपारी बारा वाजेपर्यंत तोडगा काढला नाही, तर रेल्वे वाहतूक (Railway Traffic) रोखण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आमची चर्चेची तयारी आहे, मात्र सरकारनेच चर्चेची दारं बंद केली आहेत, असा आरोपही बच्चू कडू यांनी केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement