Farmers' Protest: 'रोजचं मरण जगण्यापेक्षा एकदाच मरू', शेतकऱ्यांचा आक्रोश
Continues below advertisement
आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचा महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा (Tractor Morcha) नागपूरच्या (Nagpur) दिशेने निघाला आहे. 'रोजचं मरण नेल्यापेक्षा एक दिवसचा मरण मरायला आम्ही तयार आहे,' अशी संतप्त भावना मोर्चातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण कर्जमाफी (Loan Waiver), शेतमालाला हमीभाव (MSP) आणि नाफेडमार्फत (NAFED) सोयाबीन खरेदी सुरू करावी या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. पावसातही न डगमगता, १५ दिवसांचा अन्नधान्याचा साठा सोबत घेऊन शेतकरी या 'आरपार'च्या लढाईसाठी सज्ज झाले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement