Bacchu Kadu | पाच दिवसांचा आठवडा! सात दिवसांचा पगार : बच्चू कडू | ABP Majha
Continues below advertisement
सरकारी अधिकाऱ्यांबाबतचं बच्चू कडू यांचं 'विशेष प्रेम' ते मंत्री होण्याआधीपासूनच सर्वश्रुत आहे. सेवा हमी कायद्याचं पालन झालं नाही तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा देणाऱ्या मंत्री बच्चू कडू यांनी पाच दिवसाच्या आठवड्याच्या निर्णयावर अर्थातच नाराजी व्यक्त केली आहे. 5 दिवसांच्या आठवड्यावरुन बच्चू कडू यांच्याकडून ठाकरे सरकारला घरचा आहेर मिळाला आहे. राज्य सरकारच्या पाच दिवसांच्या आठवडा करण्याच्या निर्णयावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपरोधिक टीका केली आहे. पाच नाही, चार दिवसाचा आठवडा केला तरी हरकत नाही. मात्र, कामाचं मूल्यमापन करून पगार दिला पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे जनतेची कामं प्रलंबित राहत असल्याची खंतही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. 2 दिवसांचं काम न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा का केला असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
Continues below advertisement