Babasaheb Purandare यांचं 100व्या वर्षात पदार्पण, 99 दिव्यांनी महिलांकडून औक्षण, राज ठाकरे भेटीला

Continues below advertisement

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज वयाची नव्व्याण्णव वर्षे पूर्ण करुन शंभराव्या वर्षांत पदार्पण करत आहेत. या निमित्ताने पुण्यातील ज्या सोसायटीत बाबासाहेब सध्या राहतायत तिथे अभीष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. बाबासाहेब पुरंदरेंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रकांत पाटील यांनी फोनवर शुभेच्छा दिल्या आहेत. 

बाबासाहेब पुरंदरे कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांची भेट घेण्यासाठी पोहचणार आहेत. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे इतर नेतेही पोहचणार आहेत. 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शतकी वर्षातील पदार्पणानिमित अभिष्टचिंतन आणि दीर्घ आयुष्य व उत्तम आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा, अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram