Baba Siddique Shot Dead : चौथा आरोपी तीन हल्लेखोरांना मार्गदर्शन करत असल्याचा संशय

Continues below advertisement

Baba Siddique Shot Dead : चौथा आरोपी तीन हल्लेखोरांना मार्गदर्शन करत असल्याचा संशय 

 अजित पवारांच्या (Ajit Pawar)  राष्ट्रवादीचे नेते बाब सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय.  काल रात्री ही घटना घडली असून झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख पोलिसांना पटल्याची सूत्रांची माहिती आहे.. ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींपैकी करनैल सिंह हरियाणाचा तर धर्मराज कश्यप उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती आहे. हे तिन्ही हल्लेखोर रिक्षानं घटनास्थळी आल्याची माहिती असून या प्रकरणात चौथा व्यक्ती या तिघांना मार्गदर्शन करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान बाबा सिद्दीकींच्या हत्येचा तपास बिश्नोई गँगप्रमाणेच एसआरए वादाच्याही अँगलने होणार असल्याची माहिती आहे..  एबीपी माझाच्या सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिलीय. 

बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरणात तिसऱ्या आरोपीची ओळख पोलिसांना पटल्याची सूत्रांची माहिती आहे.   आरोपीनी बाबा सिद्धीकी यांचा हत्येपुर्वी बाबा सिद्धीकीवर पाळत ठेऊन हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.   रात्री उशिरपर्यंत आरोपींची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून  चौकशी सुरू होती. आरोपींची आजच वैद्यकीय चाचणी करून न्यायालयात  हजर केले जाणार आहे.  गुन्हे शाखेची पथकं फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram