Devendra Fadnavis | सातबारा कोरा, हेक्टरी 25 हजार मदतीची घोषणा कुठं विरली? : देवेंद्र फडणवीस
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सातबारा कोरा करण्याचं वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं होतं. पण सत्तेवर येताच वचनभंग केल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. आज राज्यभरात भाजपकडून धरणं आंदोलन करण्यात आलं. आझाद मैदानावरील आंदोलनादरम्यान देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, प्रविण दरेकर आणि आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. सरकारकडून जलयुक्त शिवार, वृक्षलागवडीसारख्या योजनांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यावरही भाजप नेत्यांनी हवी तेवढी चौकशी करा असं थेट आव्हानंच सरकारला दिलंय.