Aurangabad robbery update | उद्योजक लड्डा यांच्या घरावरील दरोड्यातील सोनं आरोपीच्या बहिणीकडे सापडलं
छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक लड्डा यांच्या घरी पडलेल्या दरोड्याप्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. एन्काऊंटर करण्यात आलेला प्रमुख आरोपी अमोल खोतकरने दरोड्यातील सोने त्याच्या बहिणीला दिले होते. बहिणीने ते बावीस तोळे सोने तुळशी वृंदावनात लपवले होते. पोलिसांनी हे सोने जप्त केले आहे.