Aurangabad | शिर्डीत मानवी तस्करी, अवयवांचा व्यापार होतो का?; औरंगाबाद खंडपीठाचा प्रशासनाला सवाल | ABP Majha

Continues below advertisement
महाराष्ट्रासह देशातील एक प्रमुख श्रद्धास्थान म्हणजे साईबाबांचं शिर्डी. दरवर्षी इथं करोडो भाविक बाबांच्या दर्शनासाठी येतात. मात्र इथं येणारा प्रत्येकजण घरी परत जातो का?, असा सवाल उपस्थित झाला आहे. गर्दीच्या ठिकाणी लहान मुलं किंवा वृद्ध काय पण कधी कधी प्रौढ, समंजस व्यक्तीही हरवतात. मात्र शिर्डीत साल 2017 मध्ये लहान मुलं, वृद्ध, महिला, पुरूष असे मिळून थोडे थोडके नव्हे तर तब्बल 88 जण बेपत्ता झाले आहेत. यामागे एखादं मानवी तस्करीचं किंवा मानवी अवयवांची तस्करी करणारं एखादं रॅकेट तर अस्तित्त्वात नाही ना?, अशी शंका व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयानं यासंदर्भात अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांना विशेष पथकाची स्थापना करून सखोल चौकशीचे निर्देश दिले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram