Aurangabad : औरंगाबादमध्ये गुंडांचा धुमाकूळ, दुकानाच्या तोडफोडीचा व्हिडिओ समोर

औरंगाबादच्या वाळूज भागात पुन्हा एकदा गुंडाचा धुमाकूळ आणि दहशत पाहायला मिळाली आहे, दारू पिऊन रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना अडवून पैसे मागणे तसेच पैसे न देणाऱ्या लोकांना या गुंडांकडून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, तर वाळूज भागातील प्रताप चौकातील हा प्रकार असून, यातील एका आरोपी तडीपार असल्याचे सुद्धा समोर आले आहे, या घटनेचे व्हिडिओ सुद्धा समोर आले असून,ज्यात टोळक्यांकडून मारहाण केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे, तर याच भागातील एका दुकानात राडा घालत दुकानदाराला सुद्धा या टोळक्याने मारहाण केल्याचा समोर आले आहे,त्यामुळे आता पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola