Aurangabad : नव्या व्हेरियंटची धास्ती, मंत्री विनामास्क का? जयंत पाटील, टोपेंसह मंत्री मास्कविना स्टेजवर
Continues below advertisement
ओमिक्रॉनची भीती असताना आणि सरकारनं नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं असतानाच सरकारमधलेच मंत्री नियमांना हरताळ फासत असल्याचं दिसतंय.
औरंगाबादेत आज जलसंपदा विभागाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला दिग्गज मंत्री आणि नेते उपस्थित होते.
मात्र धक्कादायक बाब म्हणजे एकाच्याही चेहऱ्यावर मास्क नव्हता. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आदी मंत्री या कार्यक्रमात व्यासपीठावर होते.
Continues below advertisement