Aurangabad: उद्योजकाच्या बंगल्यात शिरुन चोरीचा प्रयत्न
abp majha web team
Updated at:
29 Nov 2021 01:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबादजवळील बजाजनगरात उद्योजकाच्या बंगल्यात शिरुन चोरीचा प्रयत्न झालाय. बजाजनगरातील बालाजी जाधव यांटी वाळूज औद्योगिक क्षेत्रात कंपनी आहे. चोरांनी जाधव यांच्या घरासमोरील २ कारमधील समोरच्या भागाची नासधूस झाल्याचं दिसून आलंय. त्यामुळे त्यांनी घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता मध्यरात्रीनंतर तोंडावर रुमाल बांधलेला एक तरुण बंगल्यात शिरल्याचं दिसलं. यावेळी चोरानं बराच वेळ बंगल्यात शोधाशोध केली, मात्र त्याच्या हाती काहीच न लागल्यानं त्यानं बंगल्यासमोरील कारचं नुकसान करुन पळ काढला, अशी माहिती उद्योजक बालाजी जाधव यांनी दिली.