Jalna Atul Save : अतुल सावेंचा असंवेदनशीलपणा, सजलेल्या बैलगाडीतून नुकसान पाहणी

मराठवाड्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय.. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.. त्यामुळे अनेक राजकीय नेते आणि मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. दरम्यान जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी देखील आज जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र पाहणीसाठी आलेले अतुल सावे चक्क सजवलेल्या बैलगाडीतून पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त केले जातंय.. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताय मग सजवलेली बैलगाडी कशाला? असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola