Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Continues below advertisement

Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठी अभिनेते अतुल परचूरे यांचं निधन   वयाच्या 57 वर्षी घेतला अखेरचा श्वास    जवळपास वर्षभरापूर्वी अतुल परचुरे यांनी कर्करोगावर यशस्वी मात केल्याची त्यांनी स्वत:च माहिती दिली होती.  अतुल परचुरे हे मराठी सिनेमा, नाटक आणि मालिकांमधून ते घराघरात पोहोचले होते.  सिनेमा, नाटक आणि मालिकांमधून आपल्या विनोदानं प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचं काम त्यांनी केलं. तसंच, अनेक गंभीर भूमिकाही त्यांनी लीलया पेलल्या.  अतुल परचुरे यांच्या निधनानं मराठी मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.  हिंदीत आर के लक्ष्मण की दुनिया ही मालिका चांगलीच गाजली होती. आर के लक्ष्मण यांच्या कल्पनेतील कॉमन मॅन अतुल परचुरे यांनी या मालिकेतून अत्यंत उत्तमपणे छोट्या पडद्यावर साकारला होता.   शाहरुख खानचा 'बिल्लू', सलमान खानचा 'पार्टनर' आणि अजय देवगणचा 'ऑल द बेस्ट' या चित्रपटांमध्ये दिसले होते. तसेच कपिल शर्मा शो मध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram