Mahashivratri2022 :  देवगडच्या कुणकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्ताने आकर्षक हापूस आंब्याची आरास

Continues below advertisement

Mahashivratri2022 :  दक्षिण कोकणची काशी अशी संपूर्ण कोकणासह राज्यात ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मधील समुद्र किनारी वसलेलं पांडवकालीन कुणकेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने यात्रा उत्सवाला सुरवात झाली आहे. महाशिवरात्रीच्या काळात कुणकेश्वर येथे तीन दिवस जत्रा भरते. आठ ते दहा लाख भक्तांची मांदियाळी याठिकाणी पाहायला मिळते. काशी येथे १०८ शिवलिंगे आहेत तर कुणकेश्‍वर येथे १०७ शिवलिंगे आहेत. मात्र हि शिवलिंगे समुदाच्या काठावर असल्यामुळे हि ओहोटीच्या वेळीच पाहायला मिळतात. या मंदिराच्या मागे असलेल्या शिवलिंगां मुळेच या स्थानाला कोकणची काशी असे संबोधले जाते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram