Punjab Kings आयपीएलमधल्या संघाच्या कर्णधारपदी मयांक अगरवालची नियुक्ती : ABP Majha
पंजाब किंग्स या आयपीएलमधल्या संघाच्या कर्णधारपदी सलामीच्या मयांक अगरवालची नियुक्ती करण्यात आली आहे. पंजाब किंग्सनं आयपीएलच्या लिलावाआधी मयांक अगरवाल आणि अर्शदीपसिंग या दोनच शिलेदारांना आपल्या संघात कायम राखलं होतं. मयांकच्या गाठीशी आयपीएलचा तब्बल 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यानं 2018 सालाआधी पंजाब किंग्स संघात दाखल होण्याआधी, दिल्ली, पुणे आणि बंगलोर या तीन संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. मयांक अगरवालनं गेल्या 11मोसमांत आयपीएलमध्ये २३.४१च्या सरासरीनं २१३१ धावांचा रतीब घातला आहे. गेल्या तीन मोसमांमध्ये त्यानं अनुक्रमे 332 , 424 आणि 442 धावा फटकावल्या आहेत.